परिक्षेआधी सर्व्हर डाऊन झाल्याने गोंधळ, तलाठी परिक्षेच्या वेळेत मोठा बदल

राज्यातील, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्याती परिक्षेच्या आधीच सर्वर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
परिक्षेआधी सर्व्हर डाऊन झाल्याने  गोंधळ, तलाठी परिक्षेच्या वेळेत मोठा बदल

सध्या तलाठी पदाच्या भरतीसाठी राज्यभर परिक्षा घेतली जात आहे. मात्र या परिक्षेच्या वेळी खोळंबा झाल्याचं दिसून येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी भरतीची परिक्षा आज २१ ऑगस्ट रोजी पार पडत आहे. मात्र, सर्वर डाऊन झाल्याने उमेदवारांना मोठ्या मनस्तापाला समोर जावं लागतं आहे.

राज्यातील, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्याती परिक्षेच्या आधीच सर्वर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिक्षा द्यायला आलेल्या हजारो उमेदवारांना मोठ्या त्रासाला मामोरं जाव लागलं आहे. अचानक सर्वर डाऊन झाल्याने पपिक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे.

अचानक परिक्षेआधी सर्वर डाऊन झाल्याने तलाठी परिक्षेची वेळ बदलण्यात आली आहे. आज दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत होणारी परिक्षा आता २ ते ४ या वेळेत घेण्यात येणार आहे. पुण्यातील तलाठी परिक्षेच्या सेंटर्सवर हे बोर्ड लावण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in