एकनाथ शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव; महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारने काढला तोडगा

Maharashtra Assembly Elections Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २० नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पाडल्या. यावेळी संपूर्ण राज्यात ६६.०५ टक्के एवढं मतदान झाले होते. ज्यानंतर शनिवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. २८८ पैकी २३६ जागा महायुतीला मिळाल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव; महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारने काढला तोडगा
एक्स
Published on

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २० नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पाडल्या. यावेळी संपूर्ण राज्यात ६६.०५ टक्के एवढं मतदान झाले होते. ज्यानंतर शनिवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. २८८ पैकी २३६ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. त्याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी महायुतीसाठी गेम चेंजर आणि मविआच्या वाट्याला पराभव आणणाऱ्या काही मुद्द्यांबद्दल सविस्तर सांगितले आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. सर्व एक्झिट पोलचे निष्कर्ष खोटे ठरवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीच्या या यशात एकनाथ शिंदे सरकारने आणलेल्या पाच योजनांचा मोठा वाटा आहे. त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीलाच मतदान केल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीतील ट्रेंड फिरवण्यात महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, 'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' अशा घोषणा त्याचबरोबर, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंटर्नशिप योजना, अखिल भारतीय उलेमा बोर्डाचा फतवा या पाच महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांना सर्वाधिकार

विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारलेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीची शनिवारी महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मित्र पक्षासोबत चर्चा करण्यासह गटनेते, प्रतोद आणि इतर नेते निवडीचे सर्वाधिकार देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी मित्रपक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार तर शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गट नेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर नेत्यांची निवड करण्याचे सर्वाधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव सिद्धेश कदम यांनी मांडला. ऑनलाईन उपस्थित आमदार आणि कार्यकारिणीतील इतर सर्व सदस्यांनी या दोन्ही प्रस्तावांना एकमताने अनुमोदन दिले.

'जे-जे प्रश्न समोर दिसले आणि त्यामध्ये तातडीने निर्णय घेण्याची गरज होती ते सरकारने घेतले. याचे उदाहरण जर पाहायचे झाले तर, सोयाबीनचा मुद्दा... सरकारने सोयबीनला ४८९२ रुपये दर दिला. त्यात १५ टक्के जरी मॉयस्टर असले आणि अगदी किलोभर जरी असले तरी ते शेतकऱ्यांकडून खरेदी होईल हा निर्णय घेतला.

- डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना

logo
marathi.freepressjournal.in