काँग्रेसचा विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा ; 'या' चार नावांची चर्चा, उद्या घोषणा होण्याची शक्यता

काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा सांगितला असून महाविकास आघाडीने देखील हा दावा मान्य केला आहे
काँग्रेसचा विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा ; 'या' चार नावांची चर्चा, उद्या घोषणा होण्याची शक्यता

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांच्या पाठिंब्याने भाजपप्रणित शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील आठ नेत्यांनी मंत्रपदाची शपथ घेतली. दोन दिवसांपुर्वी शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे खातेवाटप देखील पार पडले. अजित पवार गटाने आपल्याला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. यामुळे अजित पवार यांच्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीचे आमदार कमी झाल्याने काँग्रेसने हा दावा केला आहे.

उद्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतं आहे. त्यामुळे काँग्रेस उद्या विरोधी पक्षेनेत्याचं नाव जाहीर करणार आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार या चार नावांची विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चा आहे. उद्या यापैकी एका नावावर काँग्रेसकडून शिक्कामोर्तब होणार आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या जागा कमी झाल्या आहेत. यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा सांगितला आहे. महाविकास आघाडीने देखील हा दावा मान्य केला आहे.

उद्यापासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. महाविकास आघाडीत सर्वाधिक संख्याबळ आमच्याकडे असल्याचा दावा करत काँग्रेसने विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा सांगितला आहे. महाविकास आघाडीने देखील ही मागणी मान्य केली आहे. यात काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण या चार नावांची चर्चा आहे. या चारही जणांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे उद्या कळणार आहे. काँग्रेसच्या नवी दिल्ली येथील पक्ष कार्यालयात यासंदर्भातील बैठक पार पडली असून काँग्रेसच्या पक्षश्रेष्टींकडे याबाबतचा अहवाल पाठवण्यात आला आहे. काँग्रेस हायकमांडकडून याबाबत कोणता निर्णय घेतला जातो हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in