"यांनी सर्वसामान्यांचा खून सरकारी रुग्णालयात केला", राज्य सरकार निरस्त करण्याची काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

आज (५ ऑक्टोबर) रोजी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.
"यांनी सर्वसामान्यांचा खून सरकारी रुग्णालयात केला", राज्य सरकार निरस्त करण्याची काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

राज्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूवरुन राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या घटनेवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यातील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आज (५ ऑक्टोबर) रोजी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.

यावेळी गेल्या महिनाभरता राज्यात निरपराध लोकांचे जीव औषध न मिळाल्याने गेले. त्या प्रत्येक कुटुंबाला १० लाखाची मदत करावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली. तसंच सरकार निरस्त करावं अशी देखील मागणी केल्याचं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.

हे दिवाळं निघालेलं सरकार आहे. उधळपट्टी करत आहे. जनतेचा कष्टाचा पैसा हे उधळत आहेत. भ्रष्टाचाराने माखलेले हे सरकार आहे. यांनी सर्वसामान्यांचा खून यांनी सरकारी रुग्णालयात केला आहे. आम्ही राज्यापालांना सरकारपासून संरक्षण करण्याचं सांगितलं, असं नाना पटोले म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी मलाईचा जुमला सुरु आहे असं सांगत, उच्च न्यायालयाने जे सुनावलं त्यामुळे राज्यपाल आणि न्यायालयावर आमचा विश्वास असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

logo
marathi.freepressjournal.in