काँग्रेसची पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी

काँग्रेसची पश्चिम बंगालमध्ये 
राष्ट्रपती राजवटीची मागणी
Published on

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने काँग्रेसला पर्याय म्हणून प्रचार करत होत्या, त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे काँग्रेसच्या भूमिकेवरून दिसून येत आहे. काँग्रेसने गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केली. बंगालमध्ये गेल्या महिन्यात २६ राजकीय हत्या झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेस नेते अधिरंजन चौधरी यांनी सांगितले की, ते या मुद्द्यावर राष्ट्रपतींना भेटून पश्चिम बंगालमध्ये कलम ३५५ अंतर्गत कारवाईची मागणी करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in