पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून काँग्रेसची घोषणा, अजित पवार म्हणाले, "लगेच गुडघ्याला बाशिंग..."

भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन अवघे तीनच दिवस झाले असताना काँग्रेस नेत्याने केली पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार असल्याची घोषणा
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून काँग्रेसची घोषणा, अजित पवार म्हणाले, "लगेच गुडघ्याला बाशिंग..."

भाजप खासदार गिरीश बापट यांचे २ दिवसांपूर्वीच निधन झाले. यामुळे आता पुणे लोकसभेची जाग रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणुकीच्या शक्यता वर्तविण्यात येत असून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभेची जागा महाविकास आघाडी लढवणार असल्याची घोषणा केली. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "गिरीश बापट यांच्या निधनाला फक्त तीनच दिवस झाले आहेत. लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही" असा शब्दात खडे बोल सुनावले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले की, "भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला फक्त तीन दिवस झाली आहेत. लगेच गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. एवढी घाई करायची काय गरज आहे? माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही? महाराष्ट्र राज्याच्या आपल्या काही परंपरा आहेत. अशी वक्तव्ये केली तर जनाची नाही, पण मनाची लाज वाटते की नाही? असे लोकं म्हणतील," अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले होते की, "आम्ही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार असून पुण्यात बिनविरोध निवडणूक होणार नाही. पोटनिवडणुकांवेळी भाजपने कुठे आम्हाला बिनविरोध निवडून येऊ दिले होते. प्रत्येकवेळी भाजप लढली असून आम्हीही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होतील, त्या ठिकाणी महाविकास आघाडी लढणार आहे." असे विधान केले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in