"राहुल गांधींना इतर संजय राऊतांसाठी वेळ पण..." 'या' काँग्रेस नेत्याने केले गंभीर आरोप

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाच्या नेत्याने गंभीर आरोप केले आहेत
"राहुल गांधींना इतर संजय राऊतांसाठी वेळ पण..." 'या' काँग्रेस नेत्याने केले गंभीर आरोप

"काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना संजय राऊतांसाठी वेळ आहे. पण, ते काँग्रेस पक्षातील नेत्यांना भेटण्यासाठी वेळ देत नाहीत," असा गंभीर आरोप नागपुरातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. यापूर्वीही अनेकदा आशिष देशमुख यांनी पक्षातील अंतर्गत वाद समोर आणला आहे. काल त्यांनी, "नाना पटोले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून दर महिन्याला १ खोका देण्यात येतो, नाना पटोलेसुद्धा लवकरच गुवाहाटीला दिसतील," असा दावा केला होता. यामुळे आता काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा सर्वांसमोर आले आहेत.

राहुल गांधींबद्दल बोलताना आशिष देशमुख म्हणाले की, "गेल्या २ वर्षांपासून राहुल गांधींच्या भेटीची वेळ मागितलेली आहे, पण ते भेटण्यासाठी वेळच देत नाहीत. काँग्रेसच्या नेत्यांपैकी अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या भेटीची वेळ मागितली असूनही राहुल गांधींना त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही. पण इतर पक्षांच्या नेत्यांना भेटण्यासाठी राहुल गांधींना वेळ आहे. काँग्रेस नेत्यांची सध्या 'घर की मुर्गी दाल बराबर' अशी गत झाली आहे." अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in