‘कराड दक्षिण’ मध्ये काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा

गाव-तालुका स्तरावर काँग्रेसची वज्रमूठ साकारण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने जनसंवाद पदयात्रा निघणार आहे.
‘कराड दक्षिण’ मध्ये काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा

कराड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. केरळ ते जम्मू काश्मीरपर्यंत देश पादाक्रांत करत राहुल गांधी यांनी काँग्रेसचा हात बळकट केला. आता गाव-तालुका स्तरावर काँग्रेसची वज्रमूठ साकारण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने जनसंवाद पदयात्रा निघणार आहे. शनिवारी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात जनसंवाद पदयात्रेला सुरुवात झाली. यात्रा संवादाची, बांधिलकी लोक भावनेची" असा गजर करत काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगावी जाणार आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे काँग्रेस आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रात निघाली. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणातील गावागावात यात्रा जाणार आहे. चचेगाव येथून पदयात्रेस सुरुवात झाली. विंग, शिंदेवाडी, घारेवाडी, कोळे फाटा, कोळे येथे जाऊन या पदयात्रेची सांगता होऊन कोळे येथे जाहिर सभा झाली. १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ वा. कराड शहरातील कार्वे नाका येथून ऑलम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव यांच्या स्मारकास अभिवादन करून यात्रेला सुरुवात होणार आहे तसेच पुढे हि पदयात्रा कार्वे, कोडोली, दुशेरे येथून जाऊन शेरे गावात सांगता सभा होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in