गोव्यातील काँग्रेसच्या आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

फुटीर आमदारांनी विधानसभेत पोहोचून वेगळे होत असल्याचे पत्र सभापती रमेश तावडकर यांना दिले
गोव्यातील काँग्रेसच्या आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह गोव्यातील काँग्रेसच्या ११ पैकी आठ आमदारांनी बुधवारी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन, भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत आता काँग्रेसकडे केवळ तीन आमदार उरले आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह या फुटीर आमदारांनी विधानसभेत पोहोचून वेगळे होत असल्याचे पत्र सभापती रमेश तावडकर यांना दिले. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, दिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर यांचा समावेश आहे. बंडखोर आमदारांची संख्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त असल्याने या आमदारांना पक्षांतरविरोधी कायदा लागू होणार नाही. यापूर्वी २०१९ मध्येही काँग्रेसच्या १५ पैकी १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांचाही सहभाग होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in