काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन ; दिग्गज नेत्यांनी दिल्या 'या' प्रतिक्रिया

दरम्यान, बाळू धानोरकर यांचे पार्थिव सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने चंद्रपूरला आणण्यात येणार आहे
काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन ; दिग्गज नेत्यांनी दिल्या 'या' प्रतिक्रिया
Published on

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पित्ताशय आणि स्वादुपिंडात संसर्ग झाल्याने धानोरकर यांना नागपुरातून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीतील मेदांता रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेरच्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनाने काँग्रेस नेते हळहळ व्यक्त करत आहेत. ऐन उमेदीच्या काळात त्यांचे अकाली निधन सर्वांनाच अस्वस्थ करेल, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.



दरम्यान, बाळू धानोरकर यांचे पार्थिव सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने चंद्रपूरला आणण्यात येणार आहे. उद्या वरोरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाळू धानोरकर यांचे भाऊ अनिल धानोरकर यांनी ही माहिती दिली.



लोकसभेतील महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार बाळू धानोरकर अनेक वर्षे शिवसेनेत होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. 2014 ते 2019 या काळात ते वरोरा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री संजय देवतळे यांचा पराभव केला होता. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करून खासदार झाले होते. 

logo
marathi.freepressjournal.in