Kasaba ByElection : "पैशांचा पाऊस थांबला आणि..." ; विजयानंतर रवींद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया

तब्बल २८ वर्षांनंतर कसबा पेठ (Kasaba ByElection) मतदारसंघामध्ये भाजपचा पराभव काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय
Kasaba ByElection : "पैशांचा पाऊस थांबला आणि..." ; विजयानंतर रवींद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया

आज कसबा पेठ मतदारसंघात (Kasaba ByElection) महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा ऐतिहासिक विजय झाला. तब्बल २८ वर्षांनंतर कसब्याला भाजप व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचा आमदार लाभला आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र यावेळी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा तब्बल ११,०४० मतांनी पराभव केला. यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले की, "पैशांचा पाऊस थांबला आणि आज मतांचा पाऊस पडतो आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मिळालेल्या विजयावर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले की, "पैशांचा पाऊस थांबला आणि आज मतांचा पाऊस पडतो आहे. कसब्याच्या नागरिकांनी त्यांना स्विकारले नाही. कसबा विधानसभेची जनता ही स्वाभिमानी असून ते कधी पैशाला भीक घालत नाही. आशीर्वाद घेणे ही परंपरा असून मी भाजप नेते गिरीश बापट यांना भेटायला जाणार. '५० खोके एकदम ओके' हे फक्त इथेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. हे परिवर्तन आता संपूर्ण राज्यभर होणार आहे. शिवसेनेवर जो हल्ला केला, हे त्याचं उत्तर आहे."

logo
marathi.freepressjournal.in