काँग्रेसचा आजचा आर्थिक अजेंडा फूट पाडणारा; राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांची टीका

काँग्रेस पक्षाने खरे म्हणजे ज्या धोरणांवर चर्चा करायला हवी त्याऐवजी ते जगभर अपयशी ठरलेल्या साम्यवादी आणि समाजवादी धोरणांबद्दल बोलत आहेत, असे मिलिंद देवरा म्हणाले.
काँग्रेसचा आजचा आर्थिक अजेंडा फूट पाडणारा; राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांची टीका

मुंबई : एकेकाळी आर्थिक सुधारणांची सुरुवात करणाऱ्या काँग्रेसकडे सध्या फूट पाडणारा आर्थिक अजेंडा आहे. आणि हा अजेंडा भारतीय आर्थिक विकासाची गाडी रुळावर आणू पाहात आहे, अशी टीका करीत शिवसेनेचे राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांनी काँग्रेस हा एक मध्यवर्ती पक्ष आहे, असे असूनही तो खूपच डावीकडे वळला असल्याचे एका मुलाखतीत सांगितले.

काँग्रेस पक्षाने खरे म्हणजे ज्या धोरणांवर चर्चा करायला हवी त्याऐवजी ते जगभर अपयशी ठरलेल्या साम्यवादी आणि समाजवादी धोरणांबद्दल बोलत आहेत, असे देवरा म्हणाले. देवरा यांनी या वर्षी जानेवारीत काँग्रेस पक्षाचा त्याग करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

काँग्रेस स्वतःच्या वारशापासून दूर जात असल्याचे लक्षण आहे, असे सांगत ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचा भारताला पुढे नेण्याचा आर्थिक अजेंडा होता. आज, मला असे वाटते की काँग्रेसकडे एक आर्थिक अजेंडा आहे जो फूट पाडणारा आहे. आज जगाला गुंतवणुकीसंबंधात चीनपासून वेगळे व्हायचे आहे व भारतात गुंतवणूक करायची आहे. ते म्हणाले की, आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसमधील बरेच लोक पक्षाच्या सध्याच्या आर्थिक दृष्टिकोनाची जबाबदारी घेणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसनेच १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक सुधारणा लागू केल्या, पण काँग्रेस त्या सुधारणांपासून दूर गेली, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in