अल्पवयीन पत्नीशी सहमतीचे शरीरसंबंध हाही बलात्कारच;नागपूर खंडपीठाचा निर्वाळा

अल्पवयीन पत्नीशी सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध हा बलात्कारच आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणातल्या आरोपीची दहा वर्षांची शिक्षाही कायम ठेवली आहे.
अल्पवयीन पत्नीशी सहमतीचे शरीरसंबंध हाही बलात्कारच;नागपूर खंडपीठाचा निर्वाळा
Published on

मुंबई : अल्पवयीन पत्नीशी सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध हा बलात्कारच आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणातल्या आरोपीची दहा वर्षांची शिक्षाही कायम ठेवली आहे.

पत्नीशी सहमतीने शरीरसंबंध ठेवायचे असतील तर तिचे वय १८ किंवा त्याहून जास्त असले पाहिजे. मात्र १८ हून कमी वयाच्या मुलीशी सहमतीने शरीरसंबंध ठेवले तरीही तो बलात्कारच आहे. त्या मुलीचा विवाह झालेला असो किंवा नसो तिच्याशी सहमतीने शरीर संबंध ठेवले तरीही तो बलात्कार आहे, असे न्यायमूर्ती जी. ए. सानप यांनी म्हटले आहे. या खंडपीठाने आरोपीला मिळालेली १० वर्षांची शिक्षाही कायम ठेवली आहे. कनिष्ठ न्यायालयात १० वर्षांची शिक्षा झाल्याने आरोपीने नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. मात्र नागपूर खंडपीठाने ही शिक्षा कायम ठेवली आहे तसेच अल्पवयीन मुलीशी सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध हा बलात्कारच आहे, असे म्हटले आहे. पीडिता अल्पवयीन मुलीशी आरोपीने बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर आरोपीने पीडितेशी लग्न केले. त्यांच्या वैवाहिक संबंधांमध्ये वितुष्ट आले. ज्यानंतर सदर पीडितेने आरोपीविरोधात न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात आरोपीच्या वकिलाकडून असा युक्तिवाद करण्यात आला की पीडिता आणि आरोपी यांचे लग्न झाले आहे. मात्र ती मुलगी अल्पवयीन आहे. त्यामुळे तिच्याशी सहमतीने शरीरसंबंध ठेवले तरीही तो बलात्कारच आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in