ठाकरे गटाच्या याचिका दाखल करण्यास संमती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा जो निकाल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला, त्याला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या विविध याचिका दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी संमती दर्शविली.
ठाकरे गटाच्या याचिका दाखल करण्यास संमती
Published on

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा जो निकाल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला, त्याला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या विविध याचिका दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी संमती दर्शविली.

मुख्यमंत्री शिंदे व त्यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या आमदारांना अपात्र ठरविण्याच्या याचिकाही अध्यक्षांनी फेटाळून लावल्या होत्या. महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपुष्टात येण्याच्या मार्गावर असली तरी या याचिका दाखल करून घेण्याची गरज आहे, अशी विनंती ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी, ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि मनोह मिस्रा यांच्या पीठाकडे केली होती.

logo
marathi.freepressjournal.in