‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे अनुदान वाढवण्याचा विचार; कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती

राज्य शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान १४,४३३ ते कमाल ७५ हजारापर्यंत अनुदान देण्यात येते.
माणिकराव कोकाटे
माणिकराव कोकाटे
Published on

मुंबई : राज्य शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान १४,४३३ ते कमाल ७५ हजारापर्यंत अनुदान देण्यात येते. वन विभागाच्या योजनेत तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. या पार्श्वभूमीवर शेततळ्याचे अनुदान वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून तो अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत नियम २६० च्या मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान परिषद सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सदाशिव खोत, राजेश राठोड, कृपाल तुमाने, सत्यजित तांबे, शिवाजीराव गर्जे, अमोल मिटकरी, पंकज भुजबळ या सदस्यांनी विधानपरिषद नियम २६० अन्वये आपली भूमिका मांडली होती, त्यास मंत्री कोकाटे यांनी उत्तर दिले.

राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू असून, याअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक ६ हजार रुपये थेट बँक खात्यात दिले जात आहेत. आतापर्यंत ८,९६१.३१ कोटींची मदत ९०.५ लाख शेतकरी कुटुंबांना वितरित करण्यात आली आहे. ठिबक सिंचन योजना अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य शासनाने लॉटरी पद्धती बंद करून प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य तत्त्व लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in