बांधकाम व्यावसायिकाचे नाशिकमध्ये अपहरण

२४ तासांहून अधिक काळ लोटला तरी अद्याप गुन्हेगारांचा शोध लागलेला नाही
बांधकाम व्यावसायिकाचे नाशिकमध्ये अपहरण

नाशिक : येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे त्यांच्या घरासमोरून गुंडांनी अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुंडांनी शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास फिल्मी स्टाइलने व्यावसायिक हेमंत पारख यांचे त्यांच्या घरासमोरूनच अपहरण केले. हे गुंड चारचाकी आणि दुचाकीवरून आले होते. आल्या आल्या त्यांनी हेमंत पारख यांना चारचाकीत कोंबले आणि सुसाट वेगाने पळून गेल्याचे सांगितले जात आहे. हेमंत पारख हे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून गजरा ग्रुपचे चेअरमन आहेत.

त्यांच्या अपहरणाला २४ तासांहून अधिक काळ लोटला तरी अद्याप गुन्हेगारांचा शोध लागलेला नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले आहे. अनेक जणांचा जबाबही घेतला आहे. हेमंत पारख यांचे अपहरण कोणी व का केले? हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे पारख यांचे अपहरण पूर्ववैमन्यस्यातून झाले का, त्यांचे कुणाशी शत्रुत्व होते का, त्यांना कुणी धमकी दिली होती का, अशा सर्व बाजूंकडून पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in