"...तर आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता", शिंदे गटाच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

सदावर्ते यांनी गाडी फोडल्याप्रकरणी बोलताना संजय गायकवाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
"...तर आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता", शिंदे गटाच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड प्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापू लागलं असून राज्यातील मराठा समाज हा आरक्षणाच्या मागणीवर आक्रमक झाला आहे. आता सदावर्तेंच्या विरोधात शिंदे गटाचे आमदारांनी देखील रोख ठोक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. गुणरस्त सदावर्ते यांच्या स्वभावामुळे महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांचे आरक्षण हिसकावले गेले आहे. असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

सदावर्ते यांनी गाडी फोडल्याप्रकरणी बोलताना संजय गायकवाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आरक्षणाविरोधातील बाजू सदावर्तेंनी प्रखरपणे कोर्टात मांडली, हे गुणरत्न सदावर्ते जसे सुडाने पेटले होते. त्यांची जी गाडी तोडली ती शिक्षा कमी आहे का? गुणरत्न सदावर्तेंना संपवायला हवं. त्यांना संपवलं असतं तर मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते शांततेने आंदोलन करतील. मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात लाखो लोकांच्या साक्षीने शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं की, मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. घाईघाईने आरक्षण दिल्यास मोठं नुकसान होईल. प्राण जाए पर वजन ना जाए, अशा प्रवृत्तीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर सर्वांनी विश्वास ठेवावा, असं देखील संजय गायकवाड म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in