संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...

१५ ऑगस्टला उपवास पाळावा, दुखवटा पाळावा, असं आवाहन भिडे यांनी केलं आहे
संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्तेत राहणाऱ्या शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी १५ ऑगस्ट हा काळ दिवस असल्याचं म्हणत राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाबाबत देखील वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी १५ ऑगस्ट हा स्वातंत्र दिवस होऊ शकत नाही कारण त्या दिवशी फाळणी झाली असल्याचं म्हटलं आहे. भिडे यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजी भिडे यांचं पुण्यातील दिघी येते रविवारी जाहीर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जन गण मन हे राष्ट्रगित होऊ शकत नाही. कारण रविंद्रनाथ टागोर यांनी ते १८ ९८ साली इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते. असं त्यांनी म्हटंल आहे. तसंच १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली होती. या दिवसी सर्वांनी उपवास पाळावा, दुखवटा पाळावा, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं आहे.

यावेळी भिडे यांनी भारताच्या राष्ट्रध्वजावर देखील वक्तव्य केलं आहे. भारताचा राष्ट्रध्वज जोवर भगवा म्हणून स्विकारला जात नाही तोवर शांत बसायचं नाही. आपली स्वतंत्र देवता जोधाबाई सारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल, असं भिडे यांनी म्हटलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले आहे. भारताची फाळणी झाली हे आपल्या मनात शल्य आहे.आपल्याला अखंड भारत पाहायचा आहे. अखंड भारत होईल, तेव्हाच समाधान होणार आहे. पण याचा अर्थ १५ ऑगस्ट १९४७ भारताचा स्वातंत्र्य दिवस नाही, हे त्या अर्थाने कुणी म्हणत असेल तर योग्य नाही. तोच आपला स्वातंत्र्य दिवस असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in