देवगड बंदरात मासेवारीवरुन वाद; खलाशाने स्वत:ला पेटवले

या घटनेनंतर देवगड पोलीस घटनास्थळी पोहचले असून पंचनामा करत आहेत.
देवगड बंदरात मासेवारीवरुन वाद; खलाशाने स्वत:ला पेटवले
Published on

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास बोटीवरील खलाशांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, या वादातून एका खलाशाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले आहे. बोटीवरील केबिनमध्ये हा वाद झाला आहे. त्यांनंतर स्वतःला पेटून घेतलेल्या खलाशाने केबिन तोडून त्याला वाचवण्यासाठी इतर खलाशी जात असताना त्याने थेट केबिनच्या मागे असणाऱ्या जाळीत उडी घेतली. मच्छिमार जाळीवर त्या खलाशाने उडी मारल्याने जाळीसह बोट देखील पेटली आणि त्यात त्या खलाशाचा जागेवरचं होरपळून मृत्यू झाला आहे, तर अन्य खलाशी वाचण्यासाठी गेले आणि ते देखील गंभीर जखमी झाले आहेत. सोबत मासेमारी नौकेला आग लागल्याने नौकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेनंतर देवगड पोलीस घटनास्थळी पोहचले असून पंचनामा करत आहेत.

मच्छिमारांमध्ये समुद्रात मासेमारी करण्याच्या हद्दीवरून वरून वाद आहे. मासेमारीच्या हद्दीवरून मच्छिमारांमध्ये अनेकदा मारहाण झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मात्र त्यातून अद्याप तोडगा निघालेला नाही. एलईडी आणि बुल नेट मासेमारी ही बेकायदेशीर आहे, तरीही मच्छीमार मासेमारी करीत असल्याने याचा फटका पारंपरिक मासेमारी करणारया मच्छीमारांना बसत आहे.

या गोष्टीवरून अनेकदा मच्छिमारांमध्ये वाद झाले आहेत. नोव्हेंबर महिन्यात मालवण-तळाशिल येथील भर समुद्रात पारंपारीक मच्छीमार आणि पर्ससीन मच्छीमार या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. या हाणामारीमध्ये तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोटीवरील खलाशांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि बोटीवरील साहित्य घेऊन गेल्याप्रकरणी तळाशिल येथील 25 जणांवर मालवण पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

logo
marathi.freepressjournal.in