देहू मधील लोकार्पण सोहळ्यात अजितदादांना भाषण करु न दिल्याबद्दल वाद

देहू संस्थानकडून संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
देहू मधील लोकार्पण सोहळ्यात अजितदादांना भाषण करु न दिल्याबद्दल वाद

देहूमध्ये मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलले. मात्र, तिथे अजित पवारांना बोलण्याची संधी देण्यात न आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.देहू संस्थानकडून संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. स्टेजवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तुषार भोसले, देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी फडणवीसांचे भाषण झाल्यानंतर सुत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने उपमुख्यमंत्री अजित पवारांना डावलून थेट पंतप्रधान मोदींना भाषण करण्यासाठी सांगितले. त्यामुळे अजित पवारांना भाषण करता आले नाही. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ६ मार्च रोजी पुण्यातील मेट्रोचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात पंतप्रधानांसमोर बोलताना राज्यपालांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, मोदींनी याबाबत माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी केली. तर भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, मिटकरी यांनी केलेले वक्तव्य हे हास्यास्पद विधान आहे.

मात्र, पंतप्रधानांचे एक शेड्यूल असते त्यानुसार वेळापत्रक ठरले असेल. त्यामुळे अजितदादा बोलले नाही म्हणजे महाराष्ट्राचा अपमान झाला असे मानण्याचे कारण नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in