शरद पवारांचे खासदार फोडण्यावरून वादावादी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर; सोनिया दुहान यांनी संपर्क केला - खा. अमर काळे

एकीकडे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन मोठे पक्ष फोडून ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी झालेले असतानाच, केंद्रातील कमकुवत मोदी सरकारला भक्कम टेकू देण्यासाठी आता शरद पवारांच्या खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याच्या वृत्तावरून बुधवारी दिवसभर आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला.
अजित पवार, शरद पवार (डावीकडून)
अजित पवार, शरद पवार (डावीकडून)
Published on

मुंबई : एकीकडे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन मोठे पक्ष फोडून ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी झालेले असतानाच, केंद्रातील कमकुवत मोदी सरकारला भक्कम टेकू देण्यासाठी आता शरद पवारांच्या खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याच्या वृत्तावरून बुधवारी दिवसभर आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाचे खासदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चेने दोन्ही बाजूंकडून वादावादी सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या ८ पैकी ७ खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ही ऑफर दिल्याची चर्चा बुधवारी चांगलीच रंगली. ‘एनडीए’च्या नेत्या सोनिया दुहान यांनी आमच्याशी संपर्क साधल्याचे खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात खासदार सुनील तटकरे यांचेही नाव घेतले गेल्याने त्यांनी आपण कोणाशीही संपर्क साधलेला नाही, असे स्पष्ट केले.

“काँग्रेसच्या सोनिया दुहान आमच्यासोबत संपर्क साधत होत्या आणि एकीकडे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन मोठे पक्ष फोडून ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी झालेले असतानाच, केंद्रातील कमकुवत मोदी सरकारला भक्कम टेकू देण्यासाठी आता शरद पवारांच्या खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याच्या वृत्तावरून बुधवारी दिवसभर आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला.

आव्हाड यांनी व्यक्त केला संताप

याविषयी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. “संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ते खासदारांना म्हणाले, बाप-लेकीला बाजूला ठेवा आणि आमच्याकडे या. एकीकडे म्हणतात की, शरद पवार आमच्या देव्हाऱ्यात आहेत. दुसरीकडे अशी कृत्य करतात. एकत्र येण्याचे नाटक करता, मग खासदारांना कशाला पळवता,” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

रोहित पवार यांनी तटकरेंवर खापर फोडले

या ऑफरचे खापर आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर फोडले आहे. रोहित पवार म्हणाले की, “अजित पवार गटाडून आमच्या आमदारांसोबत कोणत्याही प्रकारे संपर्क झाला, असे मला वाटत नाही. पण संसदेचे अधिवेशन सुरू असताना सुनील तटकरे यांनी आमच्या खासदारांशी संपर्क केल्याची चर्चा आहे. मात्र, आमचे आमदार किंवा खासदार असा कोणताही निर्णय घेणार नाहीत. आम्ही सर्वजण शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक असून ते सांगतील तोच निर्णय आम्ही घेऊ. तटकरे हे वाऱ्याच्या दिशेने जाणारे आणि व्यक्तिगत फायद्याचा विचार करणारे आहेत.”

मी कोणाशीही संपर्क साधला नाही - तटकरे

खासदार सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांचा दावा फेटाळला आहे. “मी कोणाशीही संपर्क साधला नाही. विधानसभेतील पराभवानंतर त्यांची जागा काय आहे, ते दिसून आले. मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. त्यामध्ये कधीही ‘बाप-लेक’ असा शब्दप्रयोग केला नाही. मी कुणाशीही संपर्क केला नाही. दिल्लीत अनेक कार्यक्रमात खासदार भेटतात. त्यावेळी काही चर्चा होते. पण अशाप्रकारचा संपर्क केलेला नाही.”

logo
marathi.freepressjournal.in