धुळ्यात बॅनर फाडण्यावरुन वाद ; तुफान दगडफेकीत १५ पोलिसांसह स्थानिक जखमी

पोलिसांनी या प्रकरणी १५० ते २०० जणांवर गुन्हे दाखल केले असून ६५ लोकांची ओळख पटली आहे.तर आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे
धुळ्यात बॅनर फाडण्यावरुन वाद ; तुफान दगडफेकीत १५ पोलिसांसह स्थानिक जखमी

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी इथे गुरुवारी (१० ऑगस्ट) संध्याकाळी दोन गटात वाद झाल्याने मोठा तणावर निर्माण झाला होता. पोस्टर फाडण्यावरुन झालेल्या या वादामुळे दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत १५ पोलीस कर्मचारी तसंच काही स्थानिक नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी १५० ते २०० जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यातील ६५ लोकांची ओळख पटली आहे. आतापर्यंत १३ जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. सध्या या गावात तणावपुर्ण शांतता आहे. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफेवर विश्वास ठेवू नये, असं अवाहन पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांनी केलं आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सांगवी या गावात रुट मार्च काढल्याने गावाला एकप्रकारे छावणीचं स्वरुप आलं होतं.

शिरपुरच्या सांगवी गावात काल दोन गटात वाद निर्माण झाला. आदिवासी दिनाचा बॅनर फाडल्याने तणा निर्माण झाला होता. जाब विचारण्यासाठी एक गट गेल्याने त्यांना मारहाण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतर सांगवी आणि सारणपाडा या दोन गावांमध्ये दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत दगडफेकीतील जखमी १५ पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रथोमपचार करण्यात आले. जखमी झालेल्या स्थानिक नागरिकांना देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसा या प्रकरणाता तपास करत असून दगडफेक करणाऱ्यांचं अटक सत्र सुरु झालं आहे.

दरम्यान, गावात दंगल सदृश्य परिस्थीती निर्माण झाल्याने तणावपूर्ण वातावरण तयार झालं होतं. या पार्श्वभूमीवर नागरिकांमधील भीती दूर होऊन विश्वाससाचं वातावरण निर्माण व्हावं आणि समाज कंटकांमध्ये जरब बसावी यासाठी पोलिसांकडून गावात रुट मार्च काढण्याला आला. यात स्थानिक जिल्हा पोलिसांसोबत दंगल नियंत्रक पथक आणि एसआरपीएफची कंपनी या रुट मार्चमध्ये सहभागी आहेत. परिस्थिती जरी तणावपूर्ण असली तरी पोलिसांच्या १०० टक्के नियंत्रणात आहे. यासाठी हा रुट मार्च काढत असल्याचं पोलिसांकडून सागंण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in