आषाढी यात्रेसाठी महामंडळ सज्ज! राज्यभरातून ५ हजार विशेष बस

बस सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन एसटी महामंडळाकड़ून करण्यात आलं आहे
File Photo
File PhotoANI

आषाढी एकादशी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. विठूनामाचा गजर करत वारकरी पंढपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. एसटी महामंडळ देखील सज्ज झालं आहे. कोरोनात खंडीत झालेली आषाढी वारी मागील वर्षापासून पुन्हा सुरु झाली. यावर्षी वारीसाठी एसटी महामंडळातर्फे सुमारे ५ हजार विशेष बस चालण्यात येत आहेत.

२५ जून ते ५ जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी मंगळवारी २०० अतिरिक्त बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यात्रेसह पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून बसचं नियोजन करण्यात आलं आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांनी तसंच विठ्ठल भक्तांनी या बस सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन एसटी महामंडळाकड़ून करण्यात आलं आहे.

आषाढी यात्रेनिमित्त छत्रपती संभाजीनगर प्रदेशातून १,२०० मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० आणि अमरावती येथून ७०० अशा विशेष बसचे नियोजन करण्यात आलं आहे.

आषाढी यात्रेसाठी विविध विभागातून या बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक आणि पर्यटकांची गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडूरंग व विठ्ठल कारखानाया यात्रा स्थानक अशीा चार तात्कपूरती बस स्थानकं उभारण्यात येणार आहेत. तसंच वारकरी आणि भाविकांची गैरसोय होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असा सोयी पुरवण्यात येणार आहेत. यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करुन सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन महामंडळाकडून करण्यात आलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in