पेण - तरणखोप ग्रामपंचायतीमध्ये जल जिवन योजनेत भ्रष्टाचार

पेण तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील जलजीवन योजनेच्या कामाची बिले अशीच काढण्यात आली असल्याची शक्यता
पेण - तरणखोप ग्रामपंचायतीमध्ये जल जिवन योजनेत भ्रष्टाचार

ग्रुप ग्रामपंचायत तरणरखोप येथे जल जिवन मिशन सन 2022-23 अंतर्गत काम मंजूर झाले असून, कार्यारंभ आदेश क्र. दि. 20/05/22 अन्वये मंजुर झाले असून सदर योजनेचे काम करणे गरजेचे असताना ते काम न करताच सदर कामाचा ठेका वेब कंट्रक्शन शैलेश सुरेश धानफळे विद्यानगर अलिबाग यांच्या नावे दिनांक 30 मे 2022 रोजी सदर योजनेचे बिल 20,38,607/- रु एवढी रक्कम काढण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे पेण तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील जलजीवन योजनेच्या कामाची बिले अशीच काढण्यात आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माजी जि प सदस्य डी बी पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेच्या कामाची सकल चौकशी करण्याची तसेच या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तरणखोप हद्दीत जलजीवन योजनेचे कोणतेही काम न करता, ग्रामपंचायती मध्ये कोणतेही ठराव किंवा नोंद नसताना किंवा ग्रामस्थांना सदर बाबत कोणताही कल्पना न देता ग्रामपंचायत हद्दीत कुठेही, कोणत्याही प्रकारचे काम न करता जलजीवन योजनेतील न केलेल्या कामाचे २०, ३८, ६००/- अक्षरी रुपये वीस लाख अडतीस हजार सहाशे एवढी रक्कम काढण्यात आली आहे. जा.क्र. ७०१ दि. ३०/०५/२२ अन्वये उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा रा जि प पेण यांचे पत्रामुळे ही बाब समोर आली आहे. तसेच या योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या टीममुळे ग्रामस्थांनाही या प्रकारची कल्पना आली. यामुळे त्यांना धक्का बसला आहे.

गावामध्ये पाणीटंचाई असताना इतक्या मोठ्या रकमेचा अपहार कॉन्ट्रॅक्टर, उप अभियंता, शाखा अभियंता, कार्यकाही अभियंता यांच्याकडून कोणत्याही प्रकारची पाहणी न करना डोळेझाक करून भ्रष्टाचार केला जातो ही अत्यंत गंभीर बाब आहे. तरी या भ्रष्टाचाराची चौकशी करून ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून संबधीत अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सरपंच यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी रा.जि. प. यांच्याकडे तक्रारअर्जाद्वारे केली आहे.

एन.जे. एस. इंजिनियर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व मा. जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील, सरपंच सुनील पाटील यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान सदरची बाब निदर्शनास आल्याने हे प्रकरण उघड झाले आहे.

71लाख 30 हजार रुपये एवढा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला होता. त्यातील २०, ३८, ६००/- एवढी रक्कम काम न करताच काढण्यात आली. ही बाब गंभीर असून जल जिवन मिशन योजनेतील अधिकारी यांच्या सहमतीने हा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित माजी सरपंच, ग्राम सेवक, शाखा अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता व इतरांची सखोल खातेनिहाय चौकशी करून सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांनी जो भ्रष्टाचार करून जी रक्कम हडप केली आहे ती रक्कम त्यांच्याकडून वसूल करून शासनाकडे जमा करण्यात यावी. सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकरणी आमच्याकडे कोणती कागदपत्रे व नोंद नसल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in