फेसबुक लाइव्ह करत दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

रस्त्याला परवानगी मिळत नसल्याच्या नैराश्यातून कृत्य
फेसबुक लाइव्ह करत  दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सांगली : घर आणि शेताकडे जाणाऱ्या रस्त्याला परवानगी मिळत नसल्याने फेसबुक लाइव्ह करत दाम्पत्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सकाळी विटा येथे घडली. प्रशांत प्रल्हाद कांबळे व स्वाती प्रशांत कांबळे असे या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांच्यावर विट्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपल्या घर आणि शेताकडे जाणाऱ्या रस्त्याला परवानगी मिळत नसल्याच्या कारणातून या दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. सध्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाइड नोट देखील लिहिली आहे. यात कांबळे दाम्पत्याने तहसीलदारांकडून आपले काम होत नसल्याचा आरोप केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in