प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर पुन्हा निर्बंध; वर्षाच्या अखेरीस होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा मार्ग

प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निबंध २९ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : वर्षअखेरच्या कालावधीत गर्दीच्या अपेक्षेने मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निबंधाचे उद्दिष्ट आहे, असे रेल्वेने म्हटले आहे.

प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निबंध २९ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विविध १४ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री प्रतिबंधित करण्यात आली आहे. वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही अशांचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूने सदर निर्बंधांमधून सूट देण्यात येत असून वर्षअखेरीच्या कालावधीत सुरळीत व सुरक्षित प्रवास अनुभवासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बंदी असलेली मुंबईतील स्थानके :

-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

-दादर

-लोकमान्य टिळक टर्मिनस

-ठाणे

-कल्याण

-पनवेल

बंदी असलेली अन्य रेल्वे स्थानके :

-पुणे

-नागपूर

-नाशिक रोड

-भुसावळ

-अकोला

-सोलापूर

logo
marathi.freepressjournal.in