अहमदनगर मनपा आयुक्तांवर गुन्हा; लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून कारवाई आयुक्त फरार

बांधकामास परवानगी देण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून अहमदनगर मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई करीत डॉ. जावळे यांचे राहते घर सील केले आहे.
अहमदनगर मनपा आयुक्तांवर गुन्हा; लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून कारवाई आयुक्त फरार
Published on

अहमदनगर : बांधकामास परवानगी देण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून अहमदनगर मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई करीत डॉ. जावळे यांचे राहते घर सील केले आहे. जावळे यांनी लिपिक शेखर देशपांडे याच्यामार्फत लाचेची मागणी केली होती. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्त व लिपिक फरार झाले आहेत. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने डॉ. पंकज जावळे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

एका कन्स्ट्रक्शन कंपनीला बांधकामासाठी परवाना हवा होता. या प्रकरणात १९ आणि २० जून रोजी ही लाच मागण्यात आली होती. ही परवानगी देण्यासाठी अहमदनगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी ८ लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिपिक शेखर देशपांडेच्या बुऱ्हाण नगरमधील घरावर ‘एसीबी’कडून छापा टाकण्यात आला, तर आयुक्तांचे राहते घर लाचलुचपत विभागाने सील केले. आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर लाचलुचपत विभागाचे कर्मचारी तैनात आहेत. गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून ‘एसीबी’ने ही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईसंबंधी मोठी गुप्तता पाळण्यात येत आहे.

अहमदनगर मनपा आयुक्तांवर गुन्हा; लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून कारवाई आयुक्त फरार
मोठी बातमी! अहमदनगरच्या आयुक्तांनी मागितली 8 लाखांची लाच; ACB च्या कारवाईची कुणकुण लागताच पंकज जावळे फरार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, आयुक्त पंकज जावळे यांनी लिपिक देशपांडे यांच्यामार्फत आठ लाखांची लाच मागितली होती. त्यानुसार गुरूवारी ही लाच स्वीकारली जाणार होती, पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्त आणि लिपिक दोघेही फरार झाले.

logo
marathi.freepressjournal.in