विवाहितेला FB वरील 'लिंक'वर क्लिक करणे महागात, डिटेल्स देताच अश्लील फोटो व्हायरल करत पैशांची मागणी

एका विवाहितेचे फोटो अश्लील पद्धतीने 'मॉर्फ' करीत ते 'व्हायरल' करून पैशांची मागणी करणाऱ्या अज्ञातांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विवाहितेने पोलीसात फिर्याद दिली आहे.
विवाहितेला FB वरील 'लिंक'वर क्लिक करणे महागात, डिटेल्स देताच अश्लील फोटो व्हायरल करत पैशांची मागणी

कराड : येथील एका विवाहितेचे फोटो अश्लील पद्धतीने 'मॉर्फ' करीत ते 'व्हायरल' करून पैशांची मागणी करणाऱ्या अज्ञातांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विवाहितेने पोलीसात फिर्याद दिली आहे.

येथील शहरातील एक विवाहिता खासगी नोकरी करते. गेल्या १७ जानेवारी रोजी संबंधित विवाहितेला तिच्या फेसबुक अकाऊंटवर त्वरित कर्ज मिळविण्याबाबतची एक 'लिंक' दिसली. विवाहितेने ती 'लिंक' ओपन करून पाहिले असता, त्यामध्ये वीस हजार रुपयांचे कर्ज त्वरीत मिळत असल्याची माहिती वाचनात आली. त्यानुसार सदर विवाहितेने आपले आधारकार्ड, पॅनकार्ड आणि तिचा फोटो संबंधित लिंकवर पाठवला, तसेच त्या लिंकमध्ये मोबाईल क्रमांकही देण्यास सांगितले होते, त्यानुसार मोबाईल क्रमांकही दिला होता; मात्र, काही वेळातच संबंधित विवाहितेच्या दिलेल्या मोबाईल नंबरच्या व्हॉट्सॲपवर अनोळखी क्रमांकावरून तिचा चेहरा असलेला एक अश्लील फोटो आला.

त्या फोटोवर अश्लील मजकूरही लिहिलेला होता, तसेच काही वेळातच अज्ञात क्रमांकावरून फोन आला. संबंधिताने हिंदीमध्ये बोलत विवाहितेकडे पैशाची मागणी केली व जर पैसे न दिल्यास आणखी अश्लील फोटो 'व्हायरल' करण्याची धमकी दिली. त्यामुळे संबंधित विवाहितेने तो नंबर 'ब्लॉक' केला. तरीही याच कालावधीत वेगवेगळ्या आठ ते दहा क्रमांकावरून महिलेला फोन आले. काही वेळातच महिलेचा पती आणि तिच्या मित्राचाही तिला फोन आला व त्या दोघांनीही आमच्या मोबाईल व्हॉट्सॲपला विवाहितेचे 'मॉर्फ' केलेले अश्लील फोटो आल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशीही विवाहितेला अनोळखी क्रमांकावरून वारंवार फोन येत होते. त्यामुळे अखेर या गंभीर प्रकारची दाखल घेत संबंधित व्यक्तीवर कारवाई होण्यासाठी याबाबत विवाहितेने कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in