महाराष्ट्रातील १८७ नवनिर्वाचित आमदारांवर गुन्ह्यांची नोंद; ‘एडीआर’च्या अहवालातील धक्कादायक माहिती समोर

महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल नुकताच लागला. लवकरच नवनिर्वाचित आमदार शपथ घेतीलही. मात्र निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी नवनिर्वाचित १८७ आमदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे असल्याचे समोर आले आहेत.
महाराष्ट्रातील १८७ नवनिर्वाचित आमदारांवर गुन्ह्यांची नोंद; ‘एडीआर’च्या अहवालातील धक्कादायक माहिती समोर
Published on

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल नुकताच लागला. लवकरच नवनिर्वाचित आमदार शपथ घेतीलही. मात्र निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी नवनिर्वाचित १८७ आमदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे असल्याचे समोर आले आहेत. आमदारांनी दाखल केलेल्या निवडणूक शपथपत्रातील माहितीनुसार ही धक्कादायक आकडेवारी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने जाहीर केली आहे. विशेष म्हणजे नव्या आमदारांपैकी ११८ जणांवर महिलांवर अत्याचार, भ्रष्टाचार, खून, खुनाचा प्रयत्न, निवडणूक संदर्भात गुन्हे दाखल आहेत.

यंदाच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्यांदा त्यांचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. भाजपच्या निवडून आलेल्या १३२ आमदारांपैकी ९२ आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हा दाखल आहेत. त्यात ४० टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे ५७ आमदार निवडून आले असून त्यापैकी ३८ आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. शिंदे गटाच्या ४७ टक्के आमदारांवरही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले असून २० आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे २० उमेदवार जिंकले असून त्यापैकी १३ आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. काँग्रेसच्या १६ आमदारांपैकी ९ आमदारांवर विविध गुन्हे दाखल आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे १० उमेदवार निवडून आले असून त्यापैकी ५ आमदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे एडीआरच्या अहवालात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in