उमेदवारांना प्रचारासाठी गावबंदी केल्यास गुन्हे दाखल करणार - अभिजीत राऊत

लोकसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन, कॅबिनेट हॉल येथे सोमवारी पत्रकार परिषद घेतली.
उमेदवारांना प्रचारासाठी गावबंदी केल्यास 
गुन्हे दाखल करणार - अभिजीत राऊत

प्रतिनिधी/नांदेड

नांदेड लोकसभा मतदारसंघात आता २३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत तब्बल ४३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. तसेच आता प्रचाराला सुरुवात झाली असून, उमेदवारांना प्रचारासाठी गावबंदी केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवारी (दि. ८) पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन, कॅबिनेट हॉल येथे सोमवारी पत्रकार परिषद घेतली. पुढे बोलताना ते म्हणाले, गावबंदी केल्याप्रकरणी यापूर्वी काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारांना प्रचारापासून कोणीही थांबू नये. सनदशीर मार्गाने आपला विषय मांडावा. तसेच न्यायालयाचे निर्देश आहेत.

दरम्यान, उन्हाचे प्रमाण लक्षात घेऊन मतदान केंद्रावर प्रतीक्षालयाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच तब्बल ४३ उमेदवारांनी माघार घेतील असून, त्यांनी हे कोणाच्या दबावापोटी केले का? याची विचारणा करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी स्वत:हून माघार घेत असल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in