कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी जालन्यात जमावबंदीचे आदेश

19 जून 2023 रोजी 6 वाजेपासून 3 जूलै रोजी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी असणास आहे
कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी जालन्यात जमावबंदीचे आदेश
Published on

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत.. याच पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी प्रशासनाच्या वतिने उपाययोजना करण्याचं काम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात उद्यापासून जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. हे आदेश संपूर्ण जालना जिल्ह्यात लागू असणार आहेत. जमावबंदीच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्याभरात 19 जून 2023 रोजी 6 वाजेपासून 3 जूलै रोजी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी असणास आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी पाच नागरिकांना एकाच वेळी जमता येणार नाही.

मुस्लिम बांधवांचा बकरी ईद आणि हिंदू धर्मियांचा आषाढी एकादशी हे सण 29 जून रोजी आहे तर आनंद स्वामी यात्रा, 3 जूलै रोजी गुरुपौर्णिमा असल्याने विविध मिरवणुका व कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये प्रतिबंध करण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी दिले आहेत.

त्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, सध्या राज्यातील राजकीयदृष्ट्या सत्ताधारी आणि विरोध यांच्यात विविध कारणांवरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तसंच मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विविध संघटनांकडू उपोषण, आत्मदहन, धरणे आंदोलन, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in