सुषमा अंधारेंच्या आरोपांवर दादा भुसेंचं थेट चॅलेंज, म्हणाले....

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात सुषणा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे आणि शंभुराज देसाई यांचे थेट नाव घेऊन आरोप केले आहे.
सुषमा अंधारेंच्या आरोपांवर दादा भुसेंचं थेट चॅलेंज, म्हणाले....

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात सुषणा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे आणि शंभुराज देसाई यांचे थेट नाव घेऊन आरोप केले आहे. तसंच त्यांची नार्को टेस्ट आणि चौकशी करण्याची मागमी केली आहे. यावर आता दादा भुसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी कुठल्याही चौकशीला घाबरत नसल्याचं दादा भुसे यांनी म्हटलं आहे. अंधारे ज्या चौकशीची मागणी करत आहेत ती करावी, नार्को टेस्टही करावी. आंतरराष्ट्रीय पातळीवरील चौकशी असेल ती देखील करावी. असल्या आरोपांना मी भीक घातल नाही. आमचं उत्तरदायीत्व जनतेशी, महाराष्ट्राशी आहे. चौकशीत सर्व गोष्टी समोर येतील. ड्रग्ज प्रकरणात असो वा कुठल्याही प्रकरणात संबंध आता तर पदच काय तर राजकारण सोडण्याची तयारी असल्याचं भुसे यांनी म्हटलं आहे.

दादा भुसे म्हणाले की, केवळ प्रसिद्धीसाठी बेछुट आरोप करायचे हे बरं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात कायद्याच्या चौकटीत उत्तर देऊ. या लोकांच्या माग जे बोलविता धनी आहे. त्याचा शोध घ्यावा लागेल. आरोप करणाऱ्यांची नार्को टेस्ट करावी. सुषमा अंधारे महान कार्यकर्त्या आहेत. मी लहान आहे. शिवसैनिक जनतेत राहून काम करतो. अंधारे आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्या आहेत. त्याचा सन्मान आहे. याचा अर्थ उचलली जीभ टाळूला लावायची असं नाही. ज्या यंत्रणेकडून चौकशी व्हावी वाटते त्याला समोरं जायची तयारी आहे. असं दादा भुसे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सुषमा अंधारे यांना नेहमीच प्रसिद्धीत राहण्याची सवय आहे. ललित पाटील आता पोलिसांना सापडला आहे. चौकशीत सर्व गोष्ट समोर येतील. ड्रग्ज नाशिकमध्ये असो वा देशात, जगात कुठेही असू दे त्याचं समर्थन कोण करणार आहे. चौकशीत समोर आलेत, कदाचित इतर ठिकाणी देखील हे धंदे सुरु असतील. त्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, कोणी जाणीवपूर्वक नाशिककरांचा अवमान करत असले तर हे खपवून घेणार नाही, असं देखील दादा भुसे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in