"दादागिरीला दादागिरीने उत्तर दिलं पाहिजे", इंदापूर येथील मेळाव्यातून छगन भुजबळांचा हल्लाबोल

हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील हे कुणबी प्रमाणपत्र घेणार आहेत का? असा सवाल देखील भुजबळ यांनी यावेळी केला
"दादागिरीला दादागिरीने उत्तर दिलं पाहिजे", इंदापूर येथील मेळाव्यातून छगन भुजबळांचा हल्लाबोल

मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाचा तिसरा मेळावा पुण्यातील इंदापूरमध्ये पार पडत आहे. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्रावरुन थेट निशाणा साधला आहे. त्यांनी हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. सरसकट कणबी प्रमाणपत्र दिलं तर महाराष्ट्रात मराठा उरणार नाही, असं भुजबळ म्हणाले आहेत.

इंदापूर येथील ओबीसी मेळाव्याला संबोधित करताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आपली सभा १० वाजता बंद होते. त्यांची रात्री १२ला बंद होते. त्यांना परवानगी आहे की नाही माहिती नाही. पोलिस कारवाई करत नाही. ते म्हणतील तो कायदा. कायदा फक्त तुम्हाला. ते काहीही बोलले तरी बातम्या छापून येणार. मी पंधार दिवसांनंत बोललो तरी वातावरण बिघडवलं म्हणणार, असं भुजबळ म्हणाले. राज्यात शांतता राहिली तर उद्योगधंदे येतील हे मान्य आहे. परंतु अशांतता कोण निर्माण करतोय, हे बघितलं पाहिजे. दलित समाज, नाभिक समाजावर मतदानावरुन अन्याय झाला आहे. राज्यात नेमकं चाललंय काय? राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल देखील भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

भुजबळ पुढे म्हणाले की, जरांगेंच्या उपोषणादरम्यान महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केला. मी हे दोन महिने बोलत आहे. परंतु कुणीही बोलायला तयार नाही. परंतु गृहमंत्र्यांनी विधासभेत लेखी उत्तर दिलं आहे. जमाव हिंसक झाला आणि ७९ पोलीस जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी बचावात्मक प्रतिकार केला आणि मग ५० आंदोलक जखमीझाले. ही बाजू उशिराने पुढे आली आहे. नाहीतर त्यांनी तेवढी साहनुभूती मिळाली नसती.

राज्यातील हिंचारावर देखील छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, नांदेड जिल्ह्यात देखील तसाच हिंसाचार झाला. राज्यात अशांतता कोण पसरवत आहे? सध्या दादागिरी सुरु असुन दादागिरीला दादागिरीने उत्तर दिलं पाहिजे, असं देखील ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना शिकवलं का? कुणबी प्रमाणपत्राबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील हे कुणबी प्रमाणपत्र घेणार आहेत का? याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत. सगळे शांत बसले आहेत....का? निवडणुकीसाठी? परंतु त्यांनी बोललं पाहिजे, असं भुजबळ म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in