दामिनी पालव हत्या प्रकरण : आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी; खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची ग्रामस्थांची मागणी

कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील दामिनी पालव (२३) या तरुणीच्या हत्या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दामिनी पालव हत्या प्रकरण : आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी; खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची ग्रामस्थांची मागणी
दामिनी पालव हत्या प्रकरण : आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी; खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची ग्रामस्थांची मागणी
Published on: 

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील दामिनी पालव (२३) या तरुणीच्या हत्या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा दावा कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपी साहिल धुरी (२२) याला पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या आठ तासांत वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे डाग असलेले कपडे आणि चाकू जप्त केला असून, दामिनी व आरोपीचे मोबाईलही ताब्यात घेतले आहेत. कडावल येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी आरोपीला पहाटे चारच्या सुमारास मठ येथील निवासस्थानातून ताब्यात घेतले.

दोषीला कठोर शिक्षा देण्याची मागणी

कडावल येथील मंदिरात आयोजित शोकसभेत दामिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. सभेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, संजय पडते, काका कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, मिलिंद नाईक, सरपंच रश्मी मोरजकर, विनायक राणे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in