दांडपट्ट्याला राज्यशस्त्राचा दर्जा; सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती

दांडपट्टा या महत्त्वपूर्ण शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा देण्यात येणार आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येईल.
दांडपट्ट्याला राज्यशस्त्राचा दर्जा; सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती

मुंबई : दरवर्षी आपण १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करतो. यंदाही शिवजयंती उत्साहात पार पडणार आहे. सगळीकडे शिवजयंतीची तयारी मोठ्या उत्साहाने सुरू आहे. आग्र्यातही शिवजयंती साजरी केली जाणार आहे. आग्र्यात शिवजयंती साजरी करून त्याच दिवशी दांडपट्टा हे राज्यशस्त्र म्हणून घोषित केले जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

दांडपट्टा या महत्त्वपूर्ण शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा देण्यात येणार आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येईल. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे किल्ले शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम होईल, तर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आग्र्याच्या लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.

कसा असतो दांडपट्टा?

दांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. सहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले पाते आणि मुठीवर चढवता येणारे चिलखत जोडलेले असते. चिलखत पंजा, मूठ व कोपरापर्यंतचा हात झाकेल, अशा बनावटीचे असते. जवळच्या अंतरावरून हातघाईच्या लढाई लढताना याचा वापर केला जाई. विशेषतः मराठ्यांच्या पायदळाने अनेक युद्धमोहिमांत याचा परिणामकारक वापर केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in