आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पाने देण्याची जुनी परंपरा आता बाजारात संकटात आली आहे. मागील काही वर्षांत आपट्याच्या ऐवजी ‘डुप्लिकेट सोनं’ म्हणून कांचन (कॅमलफूट ट्री) पाने विकली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट
Published on

ठाणे : दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पाने देण्याची जुनी परंपरा आता बाजारात संकटात आली आहे. मागील काही वर्षांत आपट्याच्या ऐवजी ‘डुप्लिकेट सोनं’ म्हणून कांचन (कॅमलफूट ट्री) पाने विकली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

आपट्याची पाने लहान, खरखरीत व जंगलात वाढणाऱ्या झाडांवर मिळतात. कांचनची पाने आकाराने मोठी, मुलायम आणि उंटाच्या पायासारखी दिसतात. सणाच्या काळात झाडांच्या फांद्या छाटल्यामुळे जंगलातील दुर्मिळ औषधी झाडांचा नाश होतो. दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटण्याची परंपरा टिकवायची असेल, तर सर्वात मोठी जबाबदारी झाडं वाचवण्याची आहे. झाडं टिकली, तरच परंपरा टिकेल; आणि परंपरा टिकली, तरच खरं सोनं आपल्या हातात चमकेल.

शहरीकरणाचा फटका

ग्रामीण भागातील जंगले कमी होत असल्याने, बाजारात नकली सोनं म्हणून कांचन पानांची विक्री झपाट्याने वाढली आहे. परिणामी, खरी परंपरा लोप पावत आहे आणि “सोनं” खरे की नकली, हे सामान्य डोळ्यांनी ओळखणे कठीण झाले आहे.

"जंगलातील आपटा झाडं वाचवण्यासाठी शासनाने विशेष मोहीम राबवणे गरजेचे आहे. अन्यथा काही वर्षांत आपट्याची पाने फक्त पुस्तकात किंवा संग्रहालयातच दिसतील, आणि आपल्या हातात नकली सोनंच चमकेल." - डॉ. प्रशांत सिनकर, पर्यावरण अभ्यासक

logo
marathi.freepressjournal.in