Dasara Melava: दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा एल्गार; म्हणाल्या, "स्वार्थासाठी पक्ष सोडेल एवढी..."

ही सगळी लोकनेते स्वर्गिय गोपीनाथ मुंडे यांची कृपा आहे. म्हणूनच मी लोकांसाठी लढत राहील, असं भाजपनेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.
Dasara Melava: दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा एल्गार; म्हणाल्या, "स्वार्थासाठी पक्ष सोडेल एवढी..."

आज विजया दशमी म्हणजेच दसऱ्याच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी आपला आवाज कोणीही दाबू शकत नसल्याचा एल्गार केला आहे. त्या म्हणाल्या की, कारखान्याला नोटीस आल्यावर दोन दिवसांमध्ये ११ कोटी रुपयांचा निधी जमा करुन देणारे आणि तसा धनादेश जमा करणारे आपण लोक आहात. तुमच्या जोरावर माझे राजकारण सुरु आहे. मी एखादी निवडणूक हरले म्हणजे लोकांच्या नजरेतून हरले असं नाही. महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यातील लोक माझ्यावर प्रेम करतात हे शिवशक्ती यात्रेतून मला समजलं आहे. ही सगळी लोकनेते स्वर्गिय गोपीनाथ मुंडे यांची कृपा आहे. म्हणूनच मी लोकांसाठी लढत राहील, असं भाजपनेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.

यावेळी बोलातना पंकजा म्हणाल्या की, आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. आज मराठा आरक्षण, ओबीसींचे प्रश्न ऊसतोड कामगारांच्या समस्या असं विविध प्रश्न असाताना लोकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे. अशावेळी आपण स्वस्त बसू राहणार नाही. राज्यातील अनेक प्रश्न गंभीर आहेत. अशावेळी आज लोकांना देण्यासाठी माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे आज कोणताही प्रश्न नाही. मी एखाद्या ग्रामपंचायतीची सदस्य देखील नाही. असं असताना मी लोकांना काय देऊ शकते? मी लोकांना फक्त स्वाभीमान देऊ शकते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पक्ष सोडणार नसल्याचं केलं स्पष्ट

दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा पक्ष सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्या म्हणाल्या की, लोक सांगतात, पंकजा मुंडे पक्ष सोडणार आहेत. त्यांचं असं चाललंय तसं चाललंय....बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. पण लक्षात ठेवा. स्वार्थासाठी पक्ष सोडेल एवढी पंकजा मुंडे यांची निष्ठा लेचीपेची नाही. जोवर तुमचं प्रेम आहे. तोवर मला कोणाचीही भीती नाही, मी राजकारणात आहे ते लोकांसाठी. तुम्ही सगळे माझे आहात. माझ्या लोकांना न्याय देणं हे माझे कामचं असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळावा हा सावरगाव येथे पार पडतो. या मेळाव्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मुंडे समर्थक दाखल झाले होते. यावेळी बोलताना त्या काहीशा भावूक झाल्याचं दिसून आलं. भाजपात वारंवार डावललं जाणं आणि राज्यातील नेतृत्वाकडून होणारी कोंडी पाहता, पंकजा वेगळा निर्णय घेतला का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागलं होतं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in