स्पर्धा परीक्षांच्या तारखा रखडल्या, शरद पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

राज्यातील ३२ लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. परंतु अद्याप रखडलेल्या नियुक्त्या, परीक्षांच्या प्रलंबित जाहिराती अशी विविध मागण्यांवर चर्चा करत त्यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देत भेटीची वेळ मागितली आहे.
शरद पवार
शरद पवार
Published on

मुंबई : राज्यातील ३२ लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. परंतु अद्याप रखडलेल्या नियुक्त्या, परीक्षांच्या प्रलंबित जाहिराती अशी विविध मागण्यांवर चर्चा करत त्यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देत भेटीची वेळ मागितली आहे. राज्यात ३२ लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. या विद्यार्थ्यांची भरतीप्रक्रिया वेळेवर व्हावी परीक्षांच्या प्रलंबित असलेल्या तसेच वेळेवर नियुक्त्या जाहिराती, परीक्षांच्या तारखा व्हाव्यात, हिच एकमात्र अपेक्षा जाहीर करण्यास होत असलेला असते. परंतु सद्यस्थितीत विलंब यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रखडलेल्या नियुक्त्या, अनेक असंतोष आहे.

परीक्षा लांबणीवर

ऑगस्ट २०२४ मध्ये नियोजित असलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या दिवशी आयबीपीएस (बँक) परीक्षा असल्याने राज्य सेवा परीक्षा लांबणीवर टाकावी तसेच राज्यसेवेच्या परीक्षेत कृषीच्या २५८ जागांचा समावेश करावा आदी मागण्यांसाठी पुणे येथे परीक्षाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. तेव्हा आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र परीक्षा लांबणीवर टाकत असताना ती नेमकी कधी घेण्यात येईल याबाबत तसेच कृषी सेवेच्या जागांबाबत आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते.

logo
marathi.freepressjournal.in