७ कामगारांचे मृतदेह सापडले

कंपनीच्या व्यवस्थापनाला समोर आणा व त्यांच्यावर कारवाई करा, असा आक्रोश कामगार करत होते. आणखी चार कामगार अद्याप सापडलेले नाहीत.
७ कामगारांचे मृतदेह सापडले

महाड : महाड अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामधील ब्ल्यूजेट हेल्थकेअर या कंपनीत शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये ११ कामगार बेपत्ता झाले होते. यापैकी सात जणांचे मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागले आहेत. कंपनीवर कारवाईची जोरदार मागणी कामगारांचे नातेवाईक प्रशासनाकडे करीत आहेत.

ब्लू जेट हेल्थकेअर या कंपनीतील ११ कामगार दगावल्याची भीती व्यक्त केली जात होती. शनिवारी सकाळपासून जळालेल्या अवस्थेमध्ये सात कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या कामगारांची ओळख पटवणे कठीण आहे. त्यांचे डीएनए तपासणीसाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.

दरम्यान, ४० तासांनंतरही प्रशासनाकडून या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने अनेक कामगारांच्या नातेवाईकांनी कंपनीच्या गेटसमोर संताप व्यक्त केला. कंपनीच्या व्यवस्थापनाला समोर आणा व त्यांच्यावर कारवाई करा, असा आक्रोश कामगार करत होते. आणखी चार कामगार अद्याप सापडलेले नाहीत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in