सरावावेळी भाला लागून दहावीच्या विद्यार्थाचा मृत्यू

डोक्याला लागून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले
सरावावेळी भाला लागून दहावीच्या विद्यार्थाचा मृत्यू

अलिबाग : भालाफेकीचा सराव करताना डोक्याला भाला लागून दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. माणगावच्या वणी येथील आयएनटी ॲकेडमी इंग्लिश स्कूल ॲण्ड हायस्कूलमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत विद्यार्थ्याचं नाव हुजाईफा दावरे असे असून तो दहावीत शिकत होता. हुजाईफा तालुकास्तरीय स्पर्धेसाठी भालाफेकीचा सराव करत होता. यावेळी डोक्यात भाला घुसून त्याचा जागीच मृत्यू झाला. पोदंकुले तसेच गोरेगांव पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह प्राथमिक तपासणीनंतर शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवला.

पोलिसांनी सांगितले की, शाळेच्या मैदानावर तालुकास्तरीय स्पर्धेचा सराव करताना ही धक्कादायक घटना घडली. मृत विद्यार्थ्याने स्वच:च फेकलेला भाला त्याच्या डोक्यात घुसला आणि त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं. मात्र, तपासात दुसऱ्या विद्यार्थ्याने फेकलेला भाला डोक्याला लागून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in