चंद्रपूरला वाघिणीचा मृत्यू

३१ जुलै रोजी भद्रावती तालुक्यातील एका गावात विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार करण्यात आली होती
चंद्रपूरला वाघिणीचा मृत्यू

चंद्रपूर : बल्लारपूर वनपरिक्षेत्रात उपासमारीमुळे वाघाच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सकाळी पोंभुर्णा तालुक्यात अडीच वर्षांची वाघीण मृतावस्थेत आढळल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. पोंभुर्णा तालुक्यातील फिस्कुटी येथे जगदीश गावतुरे यांच्या शेतात मंगळवारी सकाळी ७:३० च्या सुमारास एक मजूर महिला काम करत असताना त्यांना मृतावस्थेत वाघीण आढळली. त्यांनी ही माहिती शेतमालकाला दिली. शेतमालकाने फिस्कुटीच्या सरपंचांमार्फत पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना कळवले.

माहिती मिळताच वनाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. ३१ जुलै रोजी भद्रावती तालुक्यातील एका गावात विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार करण्यात आली होती. या वाघिणीसोबतही तसाच प्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in