प्रेमविवाहाला विरोध करत जीवे मारण्याची धमकी! वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, ठाकूर कुटुंबीयांना मारहाण

पेणमधील कोलेटी वाडीतील ठाकूर कुटुंबाच्या मुलाने भोय कुटुंबाच्या मुलीशी प्रेमविवाह केल्याने नाराज झालेल्या भोय कुटुंबाने ठाकूर कुटुंबाला मारहाण केली.
प्रेमविवाहाला विरोध करत जीवे मारण्याची धमकी! वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, ठाकूर कुटुंबीयांना  मारहाण
Published on

पेण : पेणमधील कोलेटी वाडीतील ठाकूर कुटुंबाच्या मुलाने भोय कुटुंबाच्या मुलीशी प्रेमविवाह केल्याने नाराज झालेल्या भोय कुटुंबाने ठाकूर कुटुंबाला मारहाण केली. या मारहाणीत ठाकूर कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याने ठाकूर कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दामोदर बाळाराम ठाकूर (५६) हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलं विजय आणि अक्षय तसेच सुनांसोबत एकत्रित राहत आहेत. दमोदर यांचा लहान मुलगा अक्षयचे त्यांच्याच गावातील सृष्टी तुकाराम भोय या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे ठाकूर कुटुंबीयांनी त्या दोघांचे लग्न लावून दिले. मात्र हे लग्न आणि त्या दोघांचे असणारे प्रेमसंबंध हे सृष्टीच्या घरच्यांना मान्य नव्हते आणि तेव्हापासून ते ठाकूर कुटुंबीयांवर राग धरून असल्याचे दामोदर ठाकूर यांनी वडखळ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

सृष्टीचे वडील दिलीप भोय व त्यांच्या नातेवाईकांनी लोखंडी रॉड, लाथाबुक्क्यांनी दामोदर ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. सर्व जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दिलीप हाशा भोय, शैला हाशा भोय, पुष्पा हाशा भोय, तुकाराम हाशा भोय, निर्मला तुकाराम भोय, कृष्णा दिलीप भोय, मानसी तुकाराम भोय, मधुरा पांडुरंग भोय, विनीता रमाकांत नाईक, दिवेज तुकाराम भोय, नामीबाई हाशा भोय, अंश पांडुरंग भोय, सचिन दामोदर भोय, अवनाश दामोदर भोय, सुरेखा पांडुरंग भोय, अविनाश दा. भोय, सुरेखा पांडुरंग भोय, दिलीप भोय अशा १७ जणांवर मारहाण आणि

धमकी दिल्याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश मधुकर ठाकूर हे तपास करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in