केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी ; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव समोर

गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानी आणि त्यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयाजवळ मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी ; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव समोर

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गडकरींच्या नागपूर येथील कार्यालयात धमकीचा फोन आला होता. नितीन गडकरी यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावण्यात आले असून खंडणीची मागणी करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांना फोनवरून धमकी देण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएस, एएनओ आणि इतर सुरक्षा यंत्रणांसह नागपूर पोलीस सतर्क झाले आहेत. गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानी आणि त्यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयाजवळ मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या वृत्ताला पोलीस आणि जनसंपर्क कार्यालयाच्या प्रतिनिधींनी दुजोरा दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांचे खामला येथे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाला आज (शनिवारी) साडेअकरा वाजता फोन आला. फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीने नितीन गडकरी यांना आपण दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली आणि काही सेकंदात फोन कट केला. फोन घेणाऱ्या व्यक्तीने ही माहिती भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर पोलिसांनाही कळवण्यात आले. तसेच दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलवाद विरोधी अभियान पथकासह इतर यंत्रणांना सतर्क करण्यात आले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गडकरी यांच्या वर्धा रोडवरील घरासमोर आणि खामल्या येथील जनसंपर्क कार्यालयासमोर मोठा ताफा तैनात केला आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in