इर्शाळवाडीतील मृतांचा आकडा 29 वर, 52 जण अजूनही बेपत्ता

माळीणप्रमाणे परिस्थिती निर्माण झाल्यास मृतदेहांचे त्याच ठिकाणी पंचनामे करावे लागतील, मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली भीती
इर्शाळवाडीतील मृतांचा आकडा 29 वर,  52 जण अजूनही बेपत्ता
Published on

रायगडमधील इर्शाळवाडीत दरळ कोसळल्यने मोठी दुर्घटना घडली आहे. यात आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास 52 ग्रामस्थ अद्याप बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचं काम अजूनही सुरुच आहे. त्यांचा शोध न लागल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरड कोसळण्याची शक्यता असल्याने तसंच बचाव कार्य सुरु असल्याने बाहेरच्या लोकांना इर्शाळवाडीत येण्यास मनाई करण्यात आली आहे.

स्थानिक प्रशासनाने इर्शाळवाडीत 144 कलम लागू केलं आहे. बुधवारी रात्री कोसळलेल्या दरडीमुळे 48 पैकी 17 घर गाडली गेली होती. यानंतर गुरुवारी पहाटेपासून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. आज बचावकार्याचा चौथा दिवस असून आज सकाळपासून दोन मृतदेह काढण्यात आले आहेत. तर दरड दुर्घटनेत वाचलेल्या ग्रामस्थांना धीर देऊन त्यांना मानसोपचार तज्ञांकडून मार्गदर्शन केलं जात आहे.तर सोमवारपासून रेस्क्यू ऑपरेशन बंद करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

माळीण येथे घडलेल्या घटनेप्रमाणे तसंच रायगड येथील मागील मृतदेह बाहेर न काढता आल्याने ते तिथेच कुजले होते आणि त्याचं ठिकाणी पंचनामे करावे लागले होते. इर्शाळवाडीत देखील त्याचं प्रमाणे परिसस्थिती निर्माण होण्याची भीती मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. तसंच मृतांचा आकडा वाढू शकतो, असं देकील महाजान म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in