१६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय लांबणीवर? आमदारांची अध्यक्षांना मुदतवाढीची विनंती

ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना याबाबत स्मरणपत्र देखील देण्यात आलं आहे
१६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय लांबणीवर? आमदारांची अध्यक्षांना मुदतवाढीची विनंती

विधिमंडळाच्या शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून १४ दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं होतं. मात्र, आता शिवसेनेच्या ४० आमदारांनी या बाबतीत मुदतवाढ मिळण्याची विनंती केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांचं अपात्र ठरवण्यात यावं याबाबत ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना याबाबत स्मरणपत्र देखील देण्यात आलं आहे.

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्याक्षांनी घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांना नोटीस दिली आहे. मात्र याप्रकरणी आता शिवसेनेच्या ४० आमदारांनी मुदतवाढ मागितली आहे. याप्रकरणी आणखी १४ आमदारांच्या उत्तराचा आढावा घेणे बाकी आहे. यामुळे याप्रकरणी किमान दोन आढवड्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची आढवा बैठक पार पडून त्यात चर्चा झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in