
वर्धा : चिमुकल्यांना शैक्षणिक धडे देण्याकरिता राज्यात केजी, नर्सरी, किंडर गार्डनची मोठी संख्या आहे. मात्र, यांची शासन दरबारी कुठेही नोंद नाही. आता केजी, नर्सरी, किंडर गार्डनची नोंदणी व्हावी, यासंदर्भात वरिष्ठांशी बोलून निर्णय घेण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
राज्यातील शहरी व ग्रामीण भागात चिमुकल्यांसाठी अंगणवाड्या कार्यान्वित आहेत. यात चिमुकल्यांना पोषण आहारदेखील दिला जातो. एकीकडे जिल्हा परिषदेच्या काही शाळा ओस पडत असताना काही शाळांची प्रगती कॉन्हेंटलाही लाजवेल अशी आहे. अनेक ठिकाणी शिक्षक चांगले असल्यानंतर कॉन्व्हेंटमधून प्रवेश काढून जिल्हा परिषदेच्या शाळांत पालक पाल्यांना दाखल करतात. त्यामुळे अशा शाळांचा आदर्श घेत जिल्हा परिषद शाळा सुधारण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात प्रयत्न करू, असे डॉ. पंकज भोयर यांनी स्पष्ट केले.
सह्याद्रीनगर, कोळघर येथे तंबू लावून मुक्काम
वासोटा परिसरामध्ये मुक्कामाची सोय अपुरी पडल्यानंतर पर्यटक सह्याद्रीनगर, कोळघर, अंधारी, फळणी, उंबरेवाडी, कास या परिसरात देखील तंबू लावून मुक्कामाचा आनंद लुटत आहेत. बामणोली, शेंबडी, मुनावळे या ठिकाणाहून तास, दीड तासाचा बोटीचा प्रवास करून पर्यटक किल्ल्याच्या पायथ्याला गेल्यावर घनदाट जंगलातून ट्रेकला सुरुवात करतात. या घनदाट जंगलातून जाताना वेगवेगळ्या पशू-पक्ष्यांचे आवाज ऐकत निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत आहेत. किल्ल्यावर गेल्यानंतर तेथील निसर्गसौंदर्य काही औरच अनुभवता येते. पर्यटकांमध्ये प्रामुख्याने कॉलेज युवक-युवती, नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी आदी लोक मोठ्या प्रमाणात येत असतात.