महाराष्ट्र
राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय!
या पार्श्वभूमीवर सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील स्थानिक निवडणुकांवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा वादात सापडलेला असताना दुसरीकडे गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.