शैक्षणिक वर्षासाठी दुसऱ्यांदा सीईटी घेण्याचा निर्णय

परीक्षेसाठी २६ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत
 शैक्षणिक वर्षासाठी दुसऱ्यांदा सीईटी घेण्याचा निर्णय

व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्य़ा विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या विनंतीनुसार ‘पेरा' (प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन), या महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या पेरा सीईटी सेल तर्फे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी दुसऱ्यांदा सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही सीईटी परीक्षा ३० जून आणि १ व २ जुलै २०२२ दरम्यान ऑनलाईन प्रॉक्टर्डद्वारे घेतली जाणार आहे. या सीईटी परीक्षेसाठी २६ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या परीक्षेचा निकाल ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पेरा इंडियाचे अध्यक्ष व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, पेराचे उपाध्यक्ष भरत अग्रवाल आणि पेराचे सीईओ प्रा. हनुमंत पवार यांनी दिली.

प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, इंजीनियरिंग, बायोइंजीनियरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फुड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि अग्री इंजीनियरिंग या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेरा सीईटी महत्वाची आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in