
सरकारमध्ये येऊनही भूक संपली नाही का असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना केला आहे. तर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी तातडीने अधिवेशन बोलवा असे म्हणत शेतकऱ्यांना आणि जनतेला दिलासा द्यावे असेही म्हटले आहे.
मराठवाडा, विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्य सरकारने यासाठी तातडीने अधिवेशन बोलवत शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा द्यायला हवा असे अजित पवारांनी पत्रात नमुद केले आहे.
जून 20 पासून विदर्भ आणि मराठवाड्यांच्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नदी - नाल्यांना पूर आला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून अनेकांच्या शेतातील माती खरडून गेली आहे. अनेकांनवर दुबार अन् तिबार पेरणीचे संकट ओढावले आहे. राज्यभरातील धरणं जुलै महिन्यातच 65 टक्के भरली आहेत. यामुळे येणाऱ्या काळात ते ओव्हर फ्लो होताय का असा धोका असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. मात्र चिपळून रत्नागिरीमध्ये पाणी साचले नाही हे खूप चांगले झाले त्यासाठी आम्ही नद्यांमधील गाळ काढला होता.
दिल्लीच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार
मागील सरकारच्या काळातील योजना थांबविण्याचे काम हे सरकार करत आहे. त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच सरकार चालवत आहे त्यांना कुणाला त्रास द्यायचा नाही की काय असा मिश्कील सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. शिंदें - फडणवीसांना दिल्लीतून हिंरवा कंदील मिळाल्या शिवाय ते काहीच करू शकत नाही.