देशभरातील सरकारी शाळांच्या संख्येत घट पण खाजगी शाळांच्या संख्येत वाढ

देशभरातील सरकारी शाळांच्या संख्येत घट पण खाजगी शाळांच्या संख्येत वाढ

देशातील पालकांचा सरकारी शाळांपेक्षा खासगी शाळांवर विश्वास असल्याचे दिसून आले आहे. २०१८-१९ वर्षात देशभरातील सरकारी शाळांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर खासगी शाळांची संख्या सुमारे ३.६ टक्क्यांनी वाढली आहे.

सरकारी शाळांची संख्या २०१८-१९ मध्ये १ लाख ८३ हजार ६७८ होती ती २०१९-२० मध्ये १ लाख ३२ हजार ५७० वर आली आहे. म्हणजेच देशभरात ५१ हजार १०८ सरकारी शाळा कमी झाल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या यूडीआयएसई प्लस अहवालावरून एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. मात्र, या काळात खासगी शाळांची संख्या वाढली आहे. देशभरातील खाजगी शाळांची संख्या ३ लाख २५ हजार ७६० वरून ३ लाख ३७ हजार ४९९ पर्यंत पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात यूडीआयएसई प्लस ने २०२०-२१ वर्षातील शाळांच्या संख्येचा अहवाल प्रसिद्ध प्रसिद्ध केला होता. त्यात सरकारी शाळांच्या संख्येत आणखी घट झाल्याचे दिसून आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in